मराठवाड्यात दमदार पाऊस : प्रमुख धरणांचा जलसाठा वाढला, वाचा…

टीम AM : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघुप्रकल्प झपाट्याने भरू लागले आहेत. प्रमुख प्रकल्पांत 90 टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला असून, अनेक धरणे सांडव्यातून पाणी सोडू लागली आहेत.

प्रमुख धरणांचा जलसाठा वाढला

सिद्धेश्वर प्रकल्प : 92.%

येलदरी प्रकल्प : 99.54%

निम्न दुधना : 73.17%

मांजरा प्रकल्प : 94.24%

निम्न तेरणा : 96%

इसापूर प्रकल्प : 100%

माजलगाव : 50%

विष्णुपुरी : 63%

सीना कोळेगाव : 88%

मराठवाड्यातील 15 उच्च पातळीच्या बंधाऱ्यांपैकी नऊ बंधाऱ्यांत 90% वर साठा झाला आहे. उर्वरित बंधाऱ्यांत 60 ते 80% पाणी साचले आहे.