टीम AM : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्टपासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते.
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. शेतकरी बांधवांनी पिकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच नदीनाल्यांच्या खोऱ्यात किंवा पाण्याच्या प्रवाहात जाणं टाळावं, असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.



