टीम AM : हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, अंबाजोगाई शहरांसह परिसरात बुधवारी दुपारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, बुधवारी दुपारपासून आलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.
पावसानं हजेरी लावल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल रात्रीपासून पाऊस अजूनही सुरुच आहे.
काल दिनांक 16 जुलै बुधवार रोजी दुपारच्या सुमारास अंबाजोगाई शहरांसह तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.



