टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण मंगळवारी तहसीलदार विलास तरंगे यांनी सोडत पद्धतीने जाहीर केले. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात वर्ष 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय ही आरक्षणाची प्रक्रिया लहान मुलांच्या हस्ते झाली. यावेळी गटविकास अधिकारी समृध्दी दिवाने, नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, सचिन देशपांडे, स्मिता बाहेती यांची उपस्थिती होती.
असे आहे सरपंचपदाचे आरक्षण
अनुसूचित जाती (महिला) : मांडवा पठाण, देवळा, सोनवळा, तळणी, बाभळगाव, कोदरी, काळवटी तांडा आणि अकोला.
अनुसूचित जाती : दैठणा राडी, लोखंडी सावरगाव, भावठाणा, नांदडी, माकेगाव, कोपरा, ममदापूर (पाटोदा), वाघाळा (राडी).
अनुसूचित जमाती निरंक नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सांळुकवाडी, मगरवाडी / दस्तगीरवाडी, धावडी, जोडवाडी, तटबोरगाव, राडी, गिरवली बावणे, चंदनवाडी, सायगाव, घाटनांदुर, हिवरा (खु), सोमनाथ बोरगाव, गिरवली आपेट, कुसळवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : येल्डा, पुस, भारज, मूर्ती, सेलुअंबा, दत्तपूर, हातोला, कुरणवाडी, उजनी, साकूड, वरपगाव, श्रीपतरायवाडी, राडी तांडा.
सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) : मोरेवाडी, पोखरी, गित्ता, सातेफळ, धानोरा बु., वालेवाडी, कुंबेफळ, सोमनवाडी, शेपवाडी, आपेगाव, जवळगाव, सनगाव, पट्टीवडगाव, केंद्रेवाडी, सुगाव, ममदापूर (परळी), हनुमंतवाडी, नांदगाव, चिंचखडी. जोगाईवाडी/चुतुरवाडी, लिंबगाव, तेलघना, राक्षसवाडी, सौंदना, मुरुकुटवाडी, दगडवाडी, चोपनवाडी आणि दरडवाडी.
सर्वसाधारण प्रवर्ग : मुरंबी, पाटोदा (म.), अंजनपूर, पिंपरी, बागझरी, कोळकानडी, अंबलवाडी, तळेगांव घाट, निरपणा, मुडेगांव, चोथेवाडी, चनई, डिघोळ अंबा, बर्दापूर, तडोळा, राजेवाडी, उमराई, पिंपळा धायगुडा, वाकडी, डोंगर पिंपळा, कातकरवाडी, वरवटी, धानोरा (खु.), घोलपवाडी / नवाबवाडी, अंबलटेक, खापरटोन, धसवाडी, भतानवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.



