टीम AM : राज्याला बेघरमुक्त करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असून, राज्यातली प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी संपली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी आज सदनात दिली.
यावर्षी केंद्र सरकारने सर्वाधिक 30 लाख घरे महाराष्ट्राला मंजूर केली असून, त्यातल्या 20 लाख घरांना निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यभरातल्या बेघरांचं सर्वेक्षण महिनाभरात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सौर प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार 50 हजार रुपये आर्थिक मदत देत आहे, यामुळे त्यांचं वीज बिल शून्यावर यायला मदत होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.



