अंबाजोगाईत ‌’त्या’ विहिरीसाठी ‘भीक मॉंगो’ आंदोलन : असंख्य कार्यकर्ते सहभागी, वाचा…

टीम AM : अंबाजोगाई शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र लगत असलेली निजाम कालीन विहीर बुजवून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या अनाधिकृत दुकानांचे अतिक्रमण काढुन पुर्वीच्या निजामकालीन विहीरीचे पुनर्जिवीत करण्यासाठी व अतिक्रमण करण्याऱ्यास प्रोत्साहन देणाऱ्या अंबाजोगाई नगर परिषदेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज दिनांक 8 जुलै रोजी ‘भीक मॉंगो’ आंदोलन करण्यात आले. हे ‘भीक मॉंगो’ आंदोलन बँक ऑफ महाराष्ट्र पासून सुरु करण्यात आले. ‌

छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंडी बाजार, बसस्थानक ‌परिसर आणि ‌नगरपरिषद‌ परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या‌ आंदोलनाठी‌ नागरिकांनी भरभरुन ‌प्रतिसाद दिला. आंदोलनात माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष ‌अमर देशमुख, ‘भीमशक्ती’ चे भिमराव सरवदे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, ॲड. इस्माईल गवळी, हमीद चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, ‘भीक मॉंगो’ आंदोलनात जमा झालेले पैसे नगरपरिषदेकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.