टीम AM : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे वाहणार आहेत.
26 ते 30 जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच 27 ते 30 जून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या या अंदाजानंतर नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, नदी, ओढ्यांच्या जवळ जाणे टाळावे आणि हवामान विभागाच्या सूचनांनुसार वागावे, असा सल्ला देण्यात आला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातच राहणे योग्य ठरेल.