टीम AM : अंबाजोगाई शहरात आज दोन दुःखद घटना घडल्या आहेत. ॲड. कमलकिशोर पारीख आणि राजपाल सारडा यांचं दुःखद निधन झाले आहे. या घटनेमुळे पारीख आणि सारडा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्याही निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाई न्यायालय परिसरात कामकाज करीत असताना आज दुपारी अचानक ॲड. कमलकिशोर पारीख यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झाले. दुसऱ्या घटनेत सर्वांना परिचित असणारे राजपाल सारडा यांचं आता काही वेळापुर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाचं वृत कळताच सर्वांनाच धक्का बसला आहे. ॲड. कमलकिशोर पारीख आणि राजपाल सारडा हे दोघेही मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. या दोघांच्याही निधनाची बातमी कळताच अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.