टीम AM : बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गहूखेल तांडा आणि सेवालाल लमान तांडा इथं काम करणाऱ्या 15 बालकामगारांची पोलिसांनी सुटका केली आहे. यात 9 मुली तर 6 मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून ते धुणीभांडी आणि अन्य कामं करून घेतली जात होती.
यातली दोन मुलं तिथून सुटका करून अहिल्यानगर शहरात पोहचल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून हा सगळा प्रकार समोर आला.
पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्यांना सोडवलं आहे. सोडवण्यात आलेली 6 मुलं बीडच्या बालकल्याण समितीकडे तर 9 मुली आर्वीच्या सेवाश्रम प्रकल्पात पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.