हृदयद्रावक : विद्युत तारेचा लागला करंट, एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे‌ एक हृदयद्रावक घटना घडली आहे.‌ घाटनांदूर येथील 24 वर्षीय तरुण धनंजय राजाभाऊ जाधव (देशमुख) याचा शेतात काम करताना विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धनंजय दररोजप्रमाणे सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता. यावेळी शेतामध्ये असलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे त्याला जोराचा विद्युत झटका बसला. यात तो जागीच कोसळला. त्यानंतर तातडीने त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. धनंजय हा अत्यंत शांत, हसतमुख आणि सर्वांशी मनमिळावून वागणारा तरुण म्हणून ओळखला जात होता. तो आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.