मराठवाड्यात मान्सून सक्रीय : ‘यलो अलर्ट’ जारी 

टीम AM : देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रीय झाला असून अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेडमध्ये मान्सून पोहोचला आहे.

पुढील दोन दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.