टीम AM : ‘फँड्री’ फेम शालू उर्फ अभिनेत्री राजेश्वरी खरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. राजेश्वरी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असते.
नुकतेच तिने एक नंबर, तुझी कंबर गाण्यावर रिल बनवला होता. या रिलला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता तिने एका दुसऱ्या गाण्यावर रिल बनवला आहे. या व्हिडीओला देखील चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर रिल शेअर केला आहे. यात ती देखता है तू क्या या गाण्यावर आरशासमोर उभी राहून थिरकताना दिसते आहे. या गाण्यावर तिने खूप छान डान्स केला आहे. तिच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. नेटकरी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.