टीम AM : अहमदपूर तालुक्यातील धानोरा पाटीजवळ आयशर टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर सुमारे 25 जण जखमी झाले आहेत.
अहमदपूर – अंबाजोगाई रस्त्यावरील धानोरा पाटीजवळ 70 जणांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे काल रात्री हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं.
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील हे सर्व रहिवासी असून धानोरा गावात एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आले होते. जखमींवर अंबाजोगाई, अहमदपूर, किनगाव इथे उपचार सुरू आहेत.