खळबळजनक : पोटच्या मुलाने आईचा केला खून, येल्ड्यात घडली घटना, वाचा… 

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने चक्क आईचा दगडाने ठेचून खून केला आहे. ही घटना येल्डा या गावात घडली असून मृत वृध्देचं नाव चतुराबाई भानुदास सोन्नर [वय – 75] असे आहे. 

दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना काल रात्री घडल्याची माहिती मिळाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा रितसर पंचनामा केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यातील आरोपी अमृत भानुदास सोन्नर यास ताब्यात घेतले असून या घटनेमुळे येल्डा गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करित आहेत.