बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : निकालाची तारीख बदलली, कधी लागणार रिजल्ट ?

टीम AM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपण्यास अजून थोडा वेळ लागणार आहे. आधी अपेक्षित असलेला निकाल आता थोडा उशीराने, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे. 

कधी लागणार निकाल ?

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या इयत्ता 12 वी (HSC) च्या परीक्षांचे निकाल सुरुवातीला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता ही तारीख थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल आता मेच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे 10 ते 15 मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीच्या निकालाची तारीखही जवळपास निश्चित करण्यात आली असून तो 15 मे 2025 पर्यंत जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी निकाल लवकर जाहीर केला जात असल्याचेही बोर्डाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35% गुण आवश्यक आहेत. 

निकाल कुठे पाहता येईल ?

विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतील: