सर्पमित्रालाचं ‌चावला कोब्रा : उपचाराच्या अगोदरचं झाला मृत्यू, वाचा..

 टीम AM : सापांचा मसीहा अशी ओळख असलेले बिहार येथील ‘सर्पमित्र’ जय कुमार सहनी यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. सापांना पकडताना, वाचवताना आणि त्यांच्याशी खेळताना त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, ज्या सापांसोबत त्यांची मैत्री असे त्यामुळेच त्यांचा मृत्यू होईल, असे कोणासही वाटले नव्हते. मात्र, असे घडले आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील हरपूर भिंडी वार्ड क्रमांसर्कळ – 3 येथे राहणाऱ्या सहनी यांच्या आंगठ्यास विषारी कोब्रा साप चावला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

जय कुमार सहनी पाठीमागील पाच वर्षांपासूनही अधिक काळ ‘सर्पमित्र’ म्हणून ओळखले जात असत. आजवर त्यांनी अनेक विषारी साप पकडून त्यांचे नैसग्रीक अधिवास असणाऱ्या जंगलांमध्ये सोडले आहे. त्यांना लहानपणापासूनच वन्यजीव, पशू आणि पक्षांबाबत प्रेम होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्राणी, पक्षी अथवा जीव संकटात असेल तर ते त्यांच्या मदतीसाठी धावत. खास करुन सापांशी त्यांचे एक वेगळेच नाते होते. ज्यामुळे अल्पावधीतच ते ‘सर्पमित्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते सापांशी खेळताना दिसतात. त्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. 

सर्पमित्र जय कुमार सहनी यांना गुरुवारी त्यांच्या नजिकच्या गावातून एक फोन आला. ज्यामध्ये एक कोब्रा साप घरात आढळून आल्याची माहिती मिळाली. ते तातडीने साप पकडण्यास गेले. त्यांनी सापास पकडण्याचा प्रयत्न केला पण, त्यांचा अंदाज चुकला, त्यातच त्यांच्या आंगठ्यास सर्पदंश झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोवर उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टर संतोष कुमार यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.