भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : जिल्हा मुख्यालयी उद्या ‘जयभीम पदयात्रा’, वाचा… 

टीम AM : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती परवा 14 एप्रिलला साजरी होत आहे. त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी तसंच सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यटन संचालनालय मार्फत मुंबई, नाशिक आणि नागपूर इथं 14 आणि 15 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. 

या सहलीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून, या सहली विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

दरम्यान, उद्या 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी सात वाजता सर्व जिल्हा मुख्यालयी ‘जयभीम पदयात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पदयात्रा जिल्हास्तरावर भव्य स्वरूपात साजरी होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.