टीम AM : न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असणार आहेत. 14 मे रोजी भूषण गवई हे सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. भूषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश होणार आहेत.
सरन्यायाधीश म्हणून गवई यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 13 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या गवई यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देतील. त्यानंतर 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात ते शपथ घेतील.
सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर आता भूषण गवई यांचं नाव पुढील सरन्यायाधीश म्हणून आता समोर आलं आहे. भूषण गवई हे अमरावती येथील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि एक मराठी चेहरा आता सरन्यायाधीश पदाची धुरा सांभाळणार आहे.