धावडी गावावर शोककळा : एका युवकाची आत्महत्या तर दुसरा युवक बुडाला तलावात  

तलावात बुडालेल्या युवकाचा गावकऱ्यांकडून शोध सुरू 

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील धावडी गावात दोन हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. गावातील एका युवकाने आत्महत्या केली आहे तर दुसरा युवक केंद्रेवाडी तलावात बुडाला आहे. तलावात बुडालेल्या युवकाचा शोध गावकरी घेत आहेत. ह्या दोन्ही घटना काल दि. 5 एप्रिल रोजी दुपारी घडल्या आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरालगत असलेल्या रिंगरोड जवळील शेतामध्ये एका 25 वर्षीय युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रामधन उर्फ करण अशोकराव नेहरकर [वय – 25] रा. धावडी, ता. अंबाजोगाई असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.

दुसरीकडे धावडी येथील चौघे मित्र केंद्रेवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यातील एक जण खोल पाण्यात गेल्याने तो परत आला नसून गावकरी  त्याचा घेत आहेत. अंकुर राजाभाऊ तरकसे (वय – 18] रा. धावडी, ता. अंबाजोगाई असे सदरील युवकाचे नाव आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तलावात बुडालेल्या युवकाचा शोध जारी असून 24 तास उलटून गेले तरी अद्याप युवकाचा शोध लागला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.