टीम AM : मराठवाड्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड – पिशोर मार्गावर आज पहाटे ऊसानं भरलेला ट्रक पलटून झालेल्या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले आहेत.
हा ट्रक भरधाव वेगानं कन्नडहून पिशोरकडे जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
या ट्रकमध्ये 17 ऊस कामगार प्रवास करत होते. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.