टीम AM : भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पुर्व आणि वंचित बहुजन आघाडी, अंबाजोगाई यांच्या वतीने आज दिनांक 12 मार्च रोजी बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले होते.
या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या.
1. बोधगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा.
2. बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.