टीम AM : छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेलं ‘रूपे कार्ड’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. तसेच पेमेंट करण्यासाठी क्युआर कोडही देण्यात आला आहे.
महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या कार्डचं आज राज्यपाल सी पी राधाकष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. देशात ‘रूपे कार्ड’ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.
मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात : मुख्यमंत्री फडणवीस
मी स्वत: एका मुलीचा बाप आहे, त्यामुळं मी हे सांगू शकतो, की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात, आई – बापांची जास्त काळजी घेतात, त्यामुळं समाजातील मानसिकता समाजामध्ये बदलत आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.