अंबाजोगाई : अंबाजोगाई क्रिकेट ॲकडमीची खेळाडू प्रियंका गित्तेंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. तसे विभाग प्रमुख डॉ.कल्पना झरेकर यांनी पत्र देवुन कळवले आहे. उस्मानाबाद या ठिकाणी झालेल्या निवड चाचणी मध्ये तिची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संघामध्ये प्रियंका गित्तेंची तिसऱ्यांदा निवड झाली आहे.
प्रियंका सध्या औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. विद्यापीठ संघाच्या स्पर्धा भोपाळ या ठिकाणी होत आहेत. प्रियंकाच्या निवडीबदल अनंत कर्णावट, हरिष रुपडा, गोविंद टेकाळे, मोहीत परमार, ऋचा सरवदे, अजित लोमटे, शुभम लखेरा, किरण सारूक, असद जान्नुला यांनी अभिनंदन केले आहे व स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या आहेत.