टीम AM : फेब्रुवारी महिना संपूनही लाडकी बहीण योजनेचा महिला लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाही. अशा स्थितीत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हप्ता कधी दिला जाणार आहे, याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्चला महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना त्या दिवशी फेब्रुवारी महिन्याचे दिड हजार रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे विरोधकांकडून या योजनेवर टीका करण्यात येत आहे .