‘आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात आज ‘कांटे की टक्कर’, वाचा…

टीम AM : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 2 मार्चला न्यूझीलंडवर मात करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडिया या विजयानंतर ‘ए’ ग्रुपमधून साखळी फेरीत नंबर 1 ठरली. तसेच या विजयानंतर उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित झाले. त्यानुसार, टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया – ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीतील सामना आज मंगळवारी दिनांक 4 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. उपांत्य फेरीतील हा सामना जो जिंकेल तो फायनलमध्ये धडक मारणार आहे. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल तर 2 वाजता टॉस होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.