टीम AM : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात 2 मार्च रोजी न्यूझीलंडवर 44 धावांनी मात करत सलग तिसरा विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 249 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 79 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल संपूर्ण न्यूझीलंडचा डाव फक्त 205 धावांवर आटोपला.
टीम इंडियाकडून फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने 5 विकेट्स घेतल्या. केन विल्यमसन याने 81 धावा करुन न्यूझीलंडला विजयी करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या धावा न्यूझीलंडला जिंकण्यासाठी पुरेशा नव्हत्या. भारताचा आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होईल. तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत उद्या दिनांक 4 मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.