‘आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत – न्यूझीलंड आज भिडणार, वाचा…

टीम AM : ‘आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाची गाठ आज न्यूझीलंडविरुद्ध पडणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांचा हा तिसरा आणि अंतिम सामना आहे. दोन्ही संघांनी सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत आधीच प्रवेश मिळवला आहे. रविवारी 2 मार्चला होणारा सामना जिंकून ए ग्रुपमधून नंबर 1 होण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच उपांत्य फेरीच्या दृष्टीनेही हा सामना महत्त्वाचा असणार आहे.

दोन्ही संघांसाठी दुबईत होणारा सामना हा उपांत्य फेरीची रंगीत तालीम असणार आहे. तसेच ए ग्रुपमधील दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत कोणत्या संघांविरुद्ध सामना होणार ? हे भारत – न्यूझीलंड मॅचनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे या सामन्याला उपांत्य फेरीच्या दृष्टीने फार महत्त्व प्राप्त झालं आहे.