टीम AM : राज्य सरकारच्या पाचशे सेवा व्हाटसॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली.
व्हाटसॲप सेवांसाठी मेटा कंपनीसोबत करार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई टेक वीक – 2025 मध्ये गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले.
ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर व्हाटसॲपचा वापर करतात. त्यामुळे सरकारी सेवा उपलब्ध करुन देत सेवांचे एका अर्थाने लोकशाहीकरण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.