अंबाजोगाईतून जाणाऱ्या ‘शक्तीपीठ’ महामार्गाबाबत ‘एमएसआरडीसी’ ने घेतला महत्त्वाचा निर्णय, वाचा… 

टीम AM : राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या नागपूर – गोवा ‘शक्तीपीठ’ महामार्गाला कोल्हापूरकरांचा मोठा विरोध होतोय. या महामार्गासाठी राज्यातील 27 हजार हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे.

मात्र, या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आता कोल्हापुरातील प्रस्तावित संरेखन वळवून ‘शक्तिपीठ’ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल, यासाठी मोठा निर्णय घेतलाय. ‘शक्तीपीठ’ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन अखेर पर्यायी संरेखन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. ‘शक्तीपीठ’ महामार्गाला असलेला विरोध मावळला नाही तरच पर्यायी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ  वापरणार असल्याचे सांगण्यात येतय.

‘ही’ देवस्थाने जोडली जाणार

केळझरचा गणपती, कळंबचा गणपती, सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड शक्तीपीठ, तख्त सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगलीतील औदुंबर दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा यांचे समाधिस्थान आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत.