महिला आणि बालविकास विभागात 18 हजार पदांची होणार भरती, वाचा…

टीम AM : महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5 हजार 639 अंगणवाडी सेविका आणि 13 हजार 243 मदतनीस अशी एकूण 18 हजार 882 पदे भरणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. 

मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ आणि अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसचं भिवंडी शहरात अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.