टीम AM : लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका लग्नात नवरा नवरीने भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुम्हीही कौतुक कराल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. साधारणपणे लग्नाचे सर्व विधी झाल्यानंतर नवरदेव – नवरी एकमेकांसोबत रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहेत. यावेळी नवरी – नवरदेवाचे डान्स मूव्ह पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. ‘तू मेरा मेहबूबा’ या हिंदी गाण्यावर रोमँटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे.
यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी नवरदेवाला पाहून नवरीचीही रिॲक्शन पाहण्यासारखी आहे. नवरदेव काळ्या रंगाच्या सूटमध्ये देखणा दिसत आहे, तर नवरीही पिंक रंगाच्या घागरामध्ये अतिशय गोंडस दिसत आहे. नवरा नवरी रोमॅण्टिक मूडमध्ये डान्स करत असताना आजुबाजूला असणाऱ्या साऱ्यांच्याच नजरा या जोडप्यांवर होत्या. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.