टीम AM : राज्यात आज भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यात आज शिवशाही बसला भीषण अपघात होऊन 11 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 प्रवासी जखमी झाले. भंडारा – गोंदिया मार्गावरच्या बिंद्रावन टोला गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.
दरम्यान, या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीने उपचार देण्यात यावेत, अशी सूचना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत, त्यांनी जाहीर केली आहे.