सावधान ! पुस – जवळगाव परिसरात बिबट्याचा वावर : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुस – जवळगाव परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, पुस – जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात बिबट्या दिसला असून त्याने एका शेळीचा फडशा पाडला असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेमुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, बिबट्याचा वावर निदर्शनास येताच या भागातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची दूरध्वनीवरून कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाजोगाईच्या वनपाल विजया शिंगोटे यांनी त्यांच्या पथकासह पुस – जवळगाव परिसराची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत बिबट्या दिसताच वनविभागाला कल्पना द्यावी, असं आवाहन केले. त्यासोबतच ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here