टीम AM : राज्यभरात आज मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. मूळ अंबाजोगाई इथले रहिवासी असलेले आणि सध्या युरोपात नॉर्वे इथं कार्यरत असलेले गणेश कोदरकर यांनी नॉर्वेहून चोवीस तासांचा प्रवास करत मतदानाला हजेरी लावली. त्यांनी पत्नी ऋचासोबत मतदानाचा हक्क बजावला. आपला अनुभव त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना या शब्दांत व्यक्त केला.
माझं नाव गणेश कोदरकर. आजच्या दिवशीच्या मतदानासाठी मी नार्वेवरून आलेलो आहे. नॉर्वेमध्ये मी काम करतो. आजच्या दिवसासाठी खास अंबाजोगाईला माझ्या गावी येऊन मतदान केलंय. ही आवश्यक गोष्ट आहे आणि प्रत्येकाने केली पाहिजे.
दरम्यान, अंबाजोगाई शहर हे केज मतदारसंघात असून आज मतदानाच्या दिवशी मतदारसंघात अंदाजित 69.59℅ मतदान झाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी केज विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार असून याच दिवशी केज मतदारसंघाचा भावी आमदार कोण असेल ? याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे मतमोजणीकडे मतदारसंघातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.