घाटनांदूरात राडा : जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे दिले आदेश, वाचा… 

टीम AM : परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदूर या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी ‘इव्हीम’ मशीनची तोडफोड केली. या घटनेप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या ठिकाणच्या मशीनमधील मत सुरक्षित आहेत, मतदारांनी शांततेत मतदान करावे, असे आवाहन पाठक यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानास सकाळी सात वाजल्यापासून सुरवात झाली. बीड जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 47 टक्के मतदान झाले आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर या ठिकाणी काही अज्ञात लोकांनी मतदान केंद्राधिकारी यांना मारहाण करत दोन्ही ‘इव्हीम’ मशीनची तोडफोड केली.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी ज्या मतदारांनी मतदान केले आहे, त्यांचे मत सुरक्षित आहे, नव्याने मतदानासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या लोकांनी हा गैरप्रकार केला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मतदारांनी शांततेत मतदान करावे, असे आवाहन पाठक यांनी केले आहे.