विधानसभा निवडणूक : मतदानास प्रारंभ, ‘ही’ ओळखपत्र ग्राह्य, वाचा… 

टीम AM : राज्यात 288 विधानसभा मतदार संघांसोबत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला नुकताच प्रारंभ झाला आहे. राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार असून 1  लाख 427 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह इतर 12 पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल खात्याचं छायाचित्र असलेलं पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत मिळालेलं स्मार्ट कार्ड, विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र, आदींचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, असं आवाहन केलं आहे.