विधानसभा निवडणूक : मतदान केंद्र परिसरात मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट वापरास निर्बंध

टीम AM :  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यातील समाविष्ट असलेल्या 228 गेवराई, 229 माजलगाव, 230 बीड, 231 आष्टी, 232 केज व 233 परळी या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 

या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात कोणताही भंग होऊ नये व सदर आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने या मतदान केंद्र परिसरात मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट वापरास निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविनाश पाठक यांनी निर्गमित केले आहेत.

निवडणुकीशी संबंधित मतदान अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, इतर मतदानासाठी नियुक्त अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना हे प्रतिबंध लागू राहणार नाहीत, असेही आदेशात नमूद आहे.