विधानसभा निवडणूक : महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय, बॅंकाही बंद, वाचा… 

टीम AM : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुमची काही महत्त्वाची कामे सरकारी कार्यालयात किंवा बँकेत असतील तर पुढील दोन दिवसांत पूर्ण करुन घ्या. कारण, महाराष्ट्र शासनाने 20 नोव्हेंबर 2024 हा दिवस संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे.

या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्थांव्यतिरिक्त बँकाही बंद राहतील. त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी, यासाठी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात येणार आहे.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी 4 हजार 140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीचं चित्र 23 नोव्हेंबर 2024 रोजी स्पष्ट होणार आहे.