हृदयद्रावक‌ : आगीत 10 बालकांचा होरपळून मृत्यू, वाचा…

टीम AM : काळीज पिळवटणारी एक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील, बाल अतिदक्षता विभागाला काल रात्री लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. 

विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता जिल्हा अधीक्षक अविनाश कुमार यांनी वर्तवली. या बाल अतिदक्षता विभागात 54 बालकं दाखल झाली होती. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केलं आहे.