‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ : दिवाळी बोनसचे ‘ते’ पैसे मिळणार नाहीत, वाचा… 

टीम AM : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना 2500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सूरू आहे. काही निवडक महिलांनाच हा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. यासाठी काही अटी शर्थी ठेवल्याची चर्चा होती. याबाबत अनेक माध्यमांमध्ये वृत्त देखील झळकले होते. मात्र, आता दिवाळी बोनसचे हे वृत्त खोटं आहे आणि सरकारकडून अशी कोणतीही घोषणा झाली नसल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

खरं तर माझी लाडकी बहीण योजनेत चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रितपणे 3000 रूपये जमा करण्यात आले होते. या 3000 रूपयासंह महिलांना 2500 रूपयाचा दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा सूरू होती. विशेष म्हणजे काही निवडक महिलांनाच हे पैसे मिळणार असल्याचे बोलले जात होते. 

दिवाळी बोनस मिळणार नाही

लाडक्या बहिणींना 2500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचे आता महिला व बालविकास मंत्री आदिती तरकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याचे आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना दिवाळीत कोणत्याही प्रकारचा 2500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार नाही.