आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा : जिल्हाधिकारी पाठक

टीम AM : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आदर्श आचारसंहिताबाबत सर्व कार्यालय प्रमुख, पथक प्रमुखांची बैठक पाठक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या 24, 48 व 72 तासांत करावयाच्या कार्यवाही बाबत, नेमण्यात आलेल्या विविध पथकांकडून सविस्तर आढावा जिल्हाधिकारी पाठक यांनी घेतला. त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेचे पालन करणे, विविध कार्यान्वित पथके आणि त्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत आवश्यक त्या सूचनाही सर्व अधिकाऱ्यांना पाठक यांनी दिल्या आहेत. या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.