टीम AM : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्याच्या प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या असून पारदर्शक पद्धतीनं निवडणुका पार पडाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आयकर विभागही तयार असून निवडणुकीच्या कालावधीत काळ्या पैशांच्या संभाव्य व्यवहारावर नजर ठेवण्यात येणार आहे.
रोख रकमेचं वाटप, पैशाची देवाणघेवाण अशा बाबी दिसून आल्या तर नागरिकांनी 1800 – 233 – 0356 या नि:शुल्क क्रमांकावर आयकर विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन या विभागानं केलं आहे.