टीम AM : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी 3.30 वाजता पार पडली. यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूका होणार आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. पत्रकार परिषद झाल्यानंतर राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात सर्वच राजकीय पक्षांवर निर्बंध असतील. दरम्यान, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकी संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची सर्व माहिती उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी दिली.