महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा : आचारसंहिता लागू होणार 

टीम AM : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी 3.30 वाजता होणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आज विधानसभेच्या तारखांची घोषणा होतील.  

महाराष्ट्रासह झारखंडच्या निवडणुकीच्या तारखा आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्या जातील. पत्रकार परिषद झाल्यानंतर राज्यभरात आचारसंहिता लागू होईल. या काळात सर्वच राजकीय पक्षांवर निर्बंध असतील. निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीच्या आणि निकालाच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यामुळे आज दुपारी होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.