टीम AM : भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी (दि.10) मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झाले. आज त्यांच्यावर वरळीतील पारसी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. ब्रीचकँडी रुग्णालयात रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या ‘एनसीपीए’ मध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत ठेवण्यात आले होते. टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. राजकीय, सामाजिक तथा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी टाटा यांनी श्रध्दांजली वाहिली.