टीम AM : राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे. आज मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलत होते.
मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात, असे आदेश दिल्याचं आणि त्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी 950 मतदार असतील याची काळजी घेण्याची सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं.
शहरी भागातल्या जवळपास 100 टक्के आणि ग्रामीण भागातल्या 50 टक्के मतदान केंद्रावर ‘वेब कास्टिंग’ सुविधा दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व आदेश दिल्याची माहितीही निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिली.