विधानसभा निवडणूक : ‘या’ तारखेला होणार मतदान, वाचा… 

टीम AM : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी असल्याने दिवाळीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबरला निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार करण्यात येतो आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये दसरा संपताच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

साधारणपणे राजकीय विश्लेषकांकडून अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की, निवडणूक आयोग दसऱ्याच्या नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल आणि 10 ते 16 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडेल.