टीम AM : मराठवाडा आणि राज्यात मागील दोन – तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आज परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यातील बाधित शेतीची पाहणी करून स्थानिक शेतकरी बांधवांशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्याचे निर्देश मुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत. राज्य सरकार या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभे असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्यांनी दिला.
पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या जमिनींच्या नुकसानीची मदत स्वतंत्रपणे दिली जाईल तसेच मागील पिकविम्याची थकीत बाकी तातडीने वितरित करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.