महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : निवडणूक आयोगाने केली ‘ही’ घोषणा, वाचा… 

टीम AM : महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमातंर्गत पात्र नव मतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे. 

यात एक महत्वाची बाब म्हणजे मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावासोबतच स्वतःचा भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल क्रमांक जोडू शकतात. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आहे.

जम्मू काश्मीर आणि हरियाणात निवडणूका जाहीर

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. जम्मू काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात तर हरियाणातल्या 90 जागांसाठी 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होईल. दोन्ही राज्यातल्या मतदानाची मोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.