महेश बाबू चा वाढदिवस : 26 वर्षांचा असताना होते क्रश, नंतर केले लग्न, वाचा… 

टीम AM : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता महेश बाबू चा आज वाढदिवस. त्याचा जन्म 9 ऑगस्ट 1975 साली झाला. महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महेश बाबू अनेक प्रतिष्ठित ब्रँडचा चेहरा आहे. आपल्या याच स्टारडममुळे महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. अनेक ब्रँडसोबत सलग्न असण्यासोबतच त्याचे मागचे तीनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे महेश बाबू दक्षिणेतला सर्वात यशस्वी अभिनेता ठरला आहे. 

महेश बाबूचा प्रदर्शित झालेला सिनेमा ‘सरिलेरु नीकेवरु’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. हा 100 कोटींचा आकड़ा गाठणारा महेश बाबूचा लागोपाठ तिसरा सिनेमा ठरला आहे. यामध्ये महेश बाबू एका सेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला. महेश बाबूला मिळणारे चाहत्यांचे प्रेम आणि कौतुक प्रचंड आहे. त्याच्या ‘महर्षी’ सिनेमाने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले होते. तर ‘भारत अने नेनु’ या सिनेमात त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले. 

महेश बाबू आणि नम्रताची ‘लव्हस्टोरी’  

महेश बाबू फक्त 26 वर्षांचा होता. जेव्हा त्याचे क्रश नम्रता शिरोडकरवर होते. सोशल मीडियावर आयोजित प्रश्न – उत्तरांच्या सत्रात महेश बाबूने अनेक खुलासे केले, जेव्हा त्याच्या चाहत्यांपैकी एकाने त्याला विचारले की, त्याचे कोणावर कधी क्रश होते का ? त्याला उत्तर देताना महेश म्हणाला, हो, मी वयाच्या 26 वर्षांचा असताना होते. त्यानंतर मी तिच्याशी लग्न केले. महेश बाबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

शब्दांकन : संजीव वेलणकर